सामजिक उपक्रम...वृक्षारोपण करत राजाभाऊ गायकवाड यांनी वाढदिवस केला साजरा
वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
सोमेश्वरनगर - बारामतीतील करंजेपुल येथील हिंदवी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांनी वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा करंजेपुल येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले तसेच एक सामाजिक उपक्रम म्हणून वृक्षारोपण ही करण्यात आले..युवा पिडीने आवश्यक खर्च टाळत वाढदिवस साजरे करावे असेही गायकवाड बोलताना म्हणाले तसेच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व एक सामाजिक उपक्रम म्हणून वृक्षारोपण केल्याने समाधान व्यक्त केले व यापुढे असेच सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी श्री सोमेश्वर कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड ,भा.ज.पा.चे युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत भोसले ,भा.ज.पा. सोमेश्वरनगर अध्यक्ष सुधीर गायकवाड, भा.ज.पा. बारामती सरचिटणीस सुशांत सोरटे, करंजे सोसायटी व्हाईस चेअरमन महेंद्र शेंडकर ,करंजेपूल तंटामुक्ती अध्यक्ष नाना गायकवाड , उद्योजक सागर गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर ,विनोद गायकवाड , तसेच प्राथमिक शाळेचे मुखयाध्यापिका जाधव मॅडम , कोळेकर गुरुजी ,शिंदे मॅडम, वीरकर मॅडम ,गायकवाड मॅडम उपस्थित होते.