सोमेश्वरनगर ! वडगांव निंबाळकर पोलिसांकडून सराफ पेढिंवरील बंदोबस्तात वाढ..!
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी किरण आळंदीकर यांच्या पुनम ज्वेलर्स के. एम. आळंदीकर या सुवर्ण पेढीच्या नवीन शोरूम ला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या या वेळी सुरक्षा व्यवस्था,वाढत्या चोऱ्यांबाबत चर्चा झाली, काल रात्रीच वरवंड येथील सराफ पेढी फोडून सोने - चांदीचा माल चोरांनी लुटून नेला तेथील तपासाची चक्रे पोलिसांनी गतीने फिरवली असून लवकर च चोरांच्या मुसक्या आवळल्या जातील असे पोलिसांनी सांगितले,
वडगांव निंबाळकर पोलिसांच्या वतीने हद्दीतील सर्व सराफ व्यवसायिकांना दररोज बंदोबस्त असतो, पोलीस, अधिकारी सराफ दुकानांना भेट देत असतात यामध्ये आणखी वाढ करून सरांफी दुकानाचे संरक्षण आम्ही वाढवत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी सांगितले याबाबत बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे आणि करंजेपुल दूरक्षेत्राचे पोलीस सराफ व्यवसायिकांची काळजी घेत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले, सचिन काळे यांनी सहकारी पोलिसांसमवेत ए. जी. आळंदीकर सराफ पेढीला हि भेट दिली.. सुरक्षा व्यवस्थेची हि दोन्ही पेढीकडून माहिती घेऊन उत्तम दर्जाचे कॅमेरा, सायरन, शटर, लॉकर पाहून सुरक्षा व्यवस्थेबाबत कौतुक केले.
यावेळी करंजेपुल दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शेंडकर सह पोलीस,अधिकारी देखील उपस्थित होते.