...या सत्काराचा आंनद मेडल हुन अधिक - सचिन काळे
सोमेश्वरनगर - लोकांच्या अडचणी दूर करणे, पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणे हा आमच्या कामाचाच भाग आहे. काम करत असताना अनेक मेडल मिळतात मात्र फिर्यादिंच्या चेहऱ्यावरील समाधान यातच खरा आनंद आहे. पीडितांनी केलेला हा आगळावेगळा सत्कार जिव्हाळ्याचा आहे अशीच काहीशी भावना वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांची असेल.
दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील सखाराम तुकाराम शिंदे यांची मुलगी लोणी भापकर या गावात राहते. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलीला दिराकडून सातत्याने त्रास होत असल्याबाबत ची तक्रार त्यांनी वडगाव निंबाळकर उद्दिष्ट आहेत दिली होती. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याची कार्यक्षम साहेब पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी या प्रकाराची सखोल चौकशी व खात्री केली व पीडितेला न्याय मिळवून दिला.
त्यानंतर शिंदे यांनी बोरिबेल येथून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात येऊन सचिन काळे यांचा करणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. शिंदे यांनी आज वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये येत फेटा, शाल, श्रीफळ देऊन व पेढा भरवून काळे यांचा सत्कार केला. यावेळी शिंदे म्हणाले की मी अनेक अधिकारी पाहिले मात्र असा प्रामाणिक अधिकारी आज पर्यंत पाहिला नाही. पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याचदा पैशांची मागणी होते मात्र साहेबांनी त्यांचा चहा पाजून मला न्यायही दिला. आजच्या या युगात असा अधिकारी भेटणे दुर्मिळ आहे असे मत त्यांनी व्यक्त केले