सोमेश्वरनगर ! वाणेवाडी येथे ब्लॅक बेल्ट कराटे स्पर्धा उत्साहात
सोमेश्वरनगर- ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने (ता.बारामती) न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी येथे घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट स्पर्धेत सृष्टी होळकर प्रांजल भिसे दिग्विजय कर्चे यांनी प्रथम दुतीय तृतीय क्रमांक पटकावले असोसिएशनच्या वतीने परिसरातील मुला-मुलींसाठी एक दिवसाचे कराटे कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते कॅम्पचे उद्घाटन बारामतीचे खरेदी विक्रीचे संचालक विक्रम भोसले यांच्या करण्यात आले यावेळी कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले न्यू इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल संजय कांबळे सर अनिल यादव विक्रम जगताप अशोक भोसले उपस्थित होते संस्थेचे ग्रँडमास्टर प्रकाश रासकर सर्व मान्यवरांचे आभार मानले स्पर्धेत सोमेश्वरनगर पंचकुशीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता
यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे---
◆ येलो बेल्ट:राजवी चव्हाण व प्रथमेश गायकवाड
ऑरेंज बेल्ट: स्वरांजली भोसले व शारोन गायकवाड
◆ पर्पल बेल्ट फर्स्ट सेकंड: सियोन गायकवाड व मयुरेश भोसले
◆ ब्राऊन बेल्ट फर्स्ट सेकंड: कल्याणी माळी व तन्वी रणवरे
◆ ब्लॅक बेल्ट विद्यार्थी:सृष्टी होळकर प्रांजल भिसे दिग्विजय कर्चे सर्व विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष इंद्रजीत भोसले यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले
संस्थेचे ब्लॅक बेल्ट मास्टर---
मोनिका गाढवे ,प्रवीण वैरागे, यश दीक्षित ,चंद्रकांत सोनवणे ,चैतन्य कुंभार ,अथर्व बुनगे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले