'हर हर महादेव' च्या गजरात चांगला पाऊस पडु दे म्हणून सोमेश्वर देवस्थानला अभिषेक व पाकाळणी करत साकडे.
सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र सोमेश्वर शिवलिंग हे प्रति सोरटी सोमनाथ प्रती रूप म्हणून हे देवस्थान करंजे हे प्रसिद्ध आहे या वर्षी महाराष्ट्र राज्यात पङलेल्या दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे श्री सोमेश्वर देवस्थानला अभिषेक व पाकाळणी करून साद घालण्यात आली.या वर्षी पाऊस खुप लाभला आहे , मोसमी पाऊस न पडल्याने हंगाम पिके शेतकऱ्यांना घेता आली नाही त्यामुळे शेतकरी सह नागरीक संकटात सापडलेले आहे ,जुलै महिना संपत आला तरी जोराचा पाऊस झालाच नाही पुढील येणारी परिस्थिती दुष्काळ सदृश्य दिसत असल्याने बारामती तील श्री सोमेश्वर देवस्थान येथे चांगला पाऊस पडू दे, सर्वत्र असणारे ओढे नाले तुडूंब भरूदे दे म्हणून सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिक एकत्र येत व ' हर हर महादेव 'च्या जय घोषात देवाला साकडे व देवस्थान मंदिर व मूर्ती पाकळणी उपस्थित सोमेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थ वतीने देवाला साकडे घालण्यात आले.
या प्रसंगी उद्योजक संतोष कोंढाळकर,श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे, कैलास मगर, यादवराव शिंदे,बाळासाहेब शिंदे,महेंद्र शेंङकर, महेंद्र गायकवाड, अनिल हूंबरे, पांडूरंग हूंबरे ,महेश भांङवलकर, शिवाजी शेंङकर, लोकेश शेंङकर, जालिंदर शेंङकर , प्रसिध्द फोटोग्राफर जितेंद्र काकङे,पत्रकार विनोद गोलांडे आदि उपस्थित होते.