ग्रामपंचायत कर्मचारी यांचा 'मोरगाव' येथे संवाद मेळावा
बारामती तालुक्यातील नवीन कार्यकारणीचा सत्कार
मोरगाव (राहुल तावरे ) : राज्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्राम व्यवस्थेचा प्रमुख 'कणा' आहे. त्यांचा योग्य सन्मान व्हावा यासाठी काल 'मोरगाव' येथे राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुका नवनियुक्त संघटना पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
गेली अनेक वर्ष ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी पुणे व सातारा श्रमिक ग्रामपंचायत राज्य कर्मचारी संघटना कार्यरत आहे.यासाठी तालुक्यात कार्यरत असलेल्या नवीन कार्यकारणी नुकतीच निवड झाली. नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र व सत्कार समारंभ 'मोरगाव' ग्रामपंचायत सभागृहात संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर तावरे हे होते.
आयोजित कार्यक्रमासाठी राज्य कर्मचारी संघटनेचे संस्थापक ज्ञानोबा घोणे सह जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड व राज्य प्रसिद्ध प्रमुख राहुल तावरे सह बारामती ग्रा.पं कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पिंटू सावंत उपाध्यक्ष मयूर शेडगे , नवनाथ फाळके, पल्लवी बागव सरचिटणीस संजय दुबेळे सह प्रमुख
पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध प्रश्नांवर उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.
या पुढील काळात सर्वसामान्य व सर्व समावेशक व्यापक पद्धतीने कर्मचारी संघटना कार्यरत राहणार आहे. एका मला अधिक गती देण्यासाठी नव्याने बारामती तालुका कार्यकारणीत शंकर जगताप व अमोल पारसे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.