बारामती ! पिण्याचे पाण्याचे स्त्रोत घोषित करावयाच्या ठिकाणाची यादी जाहीर
■ हरकती असल्यास नोंदविण्याची संधी
बारामती, तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याचे पाण्याचे स्त्रोत घोषित करावयाच्या ठिकाणाची यादी जाहीर करण्यात आली असून याबाबत हरकती असल्यास नागरिकांनी तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन, इंदापूर मार्ग, बारामती या कार्यालयाकडे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गट विकास अधिकारी कार्यालयाने महाराष्ट्र भूजल अधिनियम १९९३, नियम १९९५ मधील नियमानुसार तालुक्यातील अंजनगाव, आंबी (बु), आंबी (खु), बऱ्हाणपुर, बाबुर्डी, चांदगुडेवाडी, चोपडज, भोंडवेवाडी, चौधरवाडी, डोर्लेवाडी, ढाकाळे, ढेकळवाडी, देऊळगाव रसाळ, दंडवाडी, धुमाळवाडी, गरदडवाडी, गुणवडी, गोजुबावी, गाडीखेल, घाडगेवाडी, होळ, जळगाव सुपे, जळगाव क.प., जळोची, जोगवडी, जराडवाडी, जैनकवाडी, कटफळ, कऱ्हावागज, कन्हेरी, करंजे, करंजे पुल, काळखैरेवाडी, काऱ्हाटी, कारखेल, काटेवाडी, कांबळेश्वर, कुरणेवाडी, कुतवळवाडी, कोळोली, कोऱ्हाळे बु., कोऱ्हाळे खु., खंडोबाची वाडी, खांडज, लाटे, लोणी भापकर, मळद, मगरवाडी (करंजे), माळेगाव बु., माळेगाव खु., माळवाडी (लोणी), माळवाडी (लाटे), मानप्पा वस्ती, मासाळवाडी, मुर्टी, मोराळवाडी, मुरुम, मुढाळे, मेडद, मोढवे, मोरगाव, नारोळी, निंबोडी, निरावागज, पणदरे, निबुंत, पवईमाळ, पळशी, पारवडी, पानसरेवाडी, पिंपळी, पाहुणेवाडी, रुई, सावळ, सांगवी, सायंबाचीवाडी, साबळेवाडी, शिर्सुफळ, शिरष्णे, शिरवली, सुपे, सोनवडी सुपे, सोरटेवाडी, सोनकसवाडी, सोनगाव, तरडोली, तांदुळवाडी, उंडवडी क.प., उंडवडी सुपे, वढाणे, वडगाव निंबाळकर, वंजारवाडी, वाणेवाडी, वाघाळवाडी, वाकी, झारगडवाडी, मोराळवाडी, उंबरओढा, खामगळवाडी या गावातील तसेच बारामती ग्रामीणमधील पिण्याचे पाण्याचे स्त्रोत घोषित करावयाच्या ठिकाणाची यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यानी दिली आहे.