राज्यातील प्रगतिशिल मधपाळांचे 5 जुलै रोजी शिबीर
पुणे : मध उद्योगाचा विकास होण्याच्या दृष्टीने रराज्यातील प्रगतशिल मधपाळांचे संवाद शिबीर बुधवार 5 जुलै रोजी मध्यवर्ती मधमाशा पालन संशोधन व प्रशिक्षण संस्था, खादी ग्रामोद्योग आयोग, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीरास मुंबई येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप मार्गदर्शन करणार आहेत. या संधीचा लाभ राज्यातील प्रगतिशिल मधपाळांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात यांनी केले आहे.