Type Here to Get Search Results !

सावित्री महिला प्रशिक्षण संस्था पिंपळी व सावित्री स्वयंसहाय्यता बचत गट पिंपळी च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची २९८ वी जयंती उत्साहात साजरी

सावित्री महिला प्रशिक्षण संस्था पिंपळी व सावित्री स्वयंसहाय्यता बचत गट पिंपळी च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची २९८ वी जयंती उत्साहात साजरी
बारामती/पिंपळी:राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती सावित्री महिला प्रशिक्षण संस्था पिंपळी व सावित्री स्वयंसहाय्यता बचत गट पिंपळीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह पिंपळी याठिकाणी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सरपंच मंगल केसकर, उपसरपंच अश्विनी बनसोडे, सदस्या स्वाती ढवाण पाटील यांचे हस्ते  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने सर्व मान्यवर महिला व ग्रामस्थ महिलांचा गुलाबपुष्प व पेढे देऊन स्वागत करण्यात आले.
    प्रस्ताविक मनोगतात संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा अविनाश थोरात यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी या खेड्यात झाला.
    सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याच्या मावळा प्रांताचा कारभार अहिल्यादेवी होळकर बघू लागल्या त्यांच्या पश्चात अहिल्याबाईनी आलमपुरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली. अति दक्षतेने अहिल्याबाई होळकर यांनी २८ वर्षे राज्यकारभार चालविला शत्रू देखील त्यांच्याबद्दल आदर बाळगत असत. मंदिरांची पुनर्बाधणी, जीर्णोधार, देवतांची प्रतिष्ठापणा तसेच घाट- रस्ते, धर्मशाळा बां धणे, अन्नछत्रे चालविंगे या लोकोपयोगी कामामुळे संपूर्ण भारतभर अहिल्याबाईंचे नाव अजरामर झाले आहे.
  त्यांचे वडील माणकोजी शिंदे है त्या गावचे पाटील होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसताना ही त्यांच्या वडीलांनी त्यांना लिहण्या-वाचण्यास शिकवले होते. अहिल्यादेवी होळकर यांचा विवाह बाजीराव पेशवे यांचे एक सरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांची शी झाला. मल्हारराव होळकर हे मावळा प्रांताचे जहागीरदार होते. अहिल्यादेवी होळकर यांचे पती खंडेराव होळकर इ.स. १७५४ मधे. कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवींना सती जाऊ दिले नाही. मल्हारराव होळकर यांचा १२ वर्षानंतर म्हणजेच २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे एका मोहिमेतर असतांना त्यांना मृत्यूने गाठले.
  अहिल्यादेवी होळकर या आचरणाने अत्यंत पवित्र स्वभावाने स्वाभीमानी, दक्ष व धर्मकारणात सर्वस्व दानी होत्या. अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या होत्या. त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने रथनेची मने जिंकली. १३ ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्यादेवी होळकर यांचे निधन झाले.
  "पुरुष जातीचा बडगा छेदून केलीत तुम्हीं समाजसेवा ,
भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानल्या जीवा,
जात-धर्म विसरुन दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा
'अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा या भाषणं व काव्य रुपी शब्दांतून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
  यावेळी सरपंच मंगल केसकर, उपसरपंच अश्विनी बनसोडे, सदस्या स्वाती ढवाण पाटील, मिनाक्षी देवकाते पाटील,संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा थोरात, उपाध्यक्ष पूनम थोरात, सचिव ज्योत्स्ना गायकवाड, खजिनदार नम्रता बनसोडे, सदस्या मानीनी थोरात, लक्ष्मी थोरात तसेच ग्रामस्थ महिला सुरेखा देवकाते, ऊर्मिला वाघ, कोमल पवार, शिला वाघ, दिपाली राजगुरू, सारिका थोरात, रेहना इनामदार आदींसह बचतगटातील व ग्रासमस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. 
सुत्रसंचालन बाळासो बनसोडे यांनी केले तर आभार सचिव ज्योत्स्ना गायकवाड यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test