सुपा ! अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेचे शटर उचकटल ; सुपे बसस्थानकानजीक घटना
सुपा - बारामती तालुक्यातील सुपे येथील एसटी बसस्थानक परिसरातील दोन पतसंस्थांचे शटर कटावणीच्या साह्याने उचकटुन अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र काहीच मुद्देमाल न मिळाल्याने त्वरीत पळ काढल्याची घटना बुधवारी ( दि.२८ ) मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली. मात्र या घटनेमुळे येथे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील बसस्थानकानजीक असणाऱ्या शिवशंभो पतसंस्थेचे शटर उचकटुन अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी त्या ठिकाणचे असणाऱ्या ड्राव्हरचे कुलूप कटावणीने उचकटुन काढले. त्यात काहीच रक्कम आढळुन आली नाही. मात्र कॅशियर रुमचे ड्राव्हरची तोडफोड करुन विविध फायली अस्ताव्यस्त केल्या होत्या. आम्ही संस्थेत काहीच ऐवज ठेवत नसल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक देविदास दुर्गाडे व येथील कर्मचारी यांनी दिली. तसेच या घटनेची तक्रार पोलिसांना दिल्याचे यावेळी सांगितले.
त्यानंतर चोरट्यांनी चांदगुडे आर्केट या इमारतीत असलेल्या कडेपठार संस्थेचे शटर उचकटले. मात्र शटर उचकटताना सायरनचा आवाज येवु लागल्याने आत प्रवेश न करताच चोरट्यांनी त्वरीत पळ काढला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी एक दोन महिण्याच्या आत अशा घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे याकामी पोलिसांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे येथील नागरिकांची मागणी आहे.
दरम्यान येथील पोलीस नाईक दत्तात्रय धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की दोन्ही पतसंस्थांचे शटर उचकटले. मात्र त्यांना रक्कम मिळुन आली नाही.
यासंदर्भात आम्ही सीसीटिव्ही फुटेज पहाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधल्याने चेहरे ओळखु येत नसुन त्यांच्या आणखीन काही खुणा आढतायेत का याचा तपास सुरु असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.
.........................................
फोटो ओळी -
सुपे येथील शिवशंभो पतसंस्थेचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटले.