Type Here to Get Search Results !

टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
पुणे : 'ज्ञानोबा माऊली-तुकाराम' असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. 

देहू येथील  जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिरात  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे,  बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आदी पूजेला उपस्थित होते. 

पूजेनंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते. 

महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test