भोर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भोर येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शालेय प्रवेश ( इयता ८ वी पासून), इयत्ता दहावीनंतर कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, बिगर व्यावसायिक, व्यावसायिक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, शारीरिक दृष्ट्या दिव्यांग व अनाथ या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षित टक्केवारीप्रमाणे त्या-त्या प्रवर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. सदर वसतिगृहाची प्रवेश प्रकीया सुरु झालेली असून मोफत प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत, अशी माहिती वसतिगृहाचे गृहपाल यांनी दिली आहे.