पुरंदर ! भारतीय पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर ;अध्यक्षपदी गोरख मेमाणे, उपाध्यक्ष सोमनाथ काळाणे तर सचिवपदी संदीप झगडे यांची निवड.
पुरंदर - भारतीय पत्रकार संघाच्या पुरंदर तालुका कार्यकारिणीची द्विवार्षिक निवडणूक जेजुरी येथील जिल्हा परिषद विश्रामगृह येथे संपन्न झाली. भारतीय पत्रकार संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रिये प्रसंगी पुरंदर तालुकाध्यक्ष पदी गोरख मेमाणे, उपाध्यक्ष पदी सोमनाथ काळाणे तर सचिव पदी संदीप झगडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी बिनविरोध पार पडलेल्या निवडणुकीत
कार्याध्यक्ष पदी - जयंत पाटील, कोषाध्यक्ष - राजेंद्र जावळेकर, पदवीधर सल्लागार - रियाज सय्यद, कायदेशीर सल्लागार - ॲड. विजय भालेराव, हल्ला कृती समिती अध्यक्ष - अमोल साबळे, प्रसिद्धी प्रमुख - अस्लमजी नदाफ, महिला कार्याध्यक्ष - सायली शिर्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या निवडणूक कार्यक्रमाचे निवडणूक अधिकारी म्हणून काशिनाथ पिंगळे व जेष्ठ पत्रकार गुणशेखर बापू जाधव यांनी कामकाज पाहिले. यावेळी माजी अध्यक्ष तथा भारतीय पत्रकार संघाचे पुणे विभागीय निरिक्षक संदीप बनसोडे, मयूर लेंडे, बापू आंबिलकर संदीप ठवाळ यांच्या सह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते. पुढील दोन वर्षात भारतीय पत्रकार संघाच्या विस्तारासाठी व पत्रकारांच्या हक्कासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याची माहिती नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गोरख मेमाणे यांनी दिली.