बारामती ! म.ए.सो हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा
बारामती - योग अर्थात प्राचीन भारतीय संस्कृती! या संस्कृतीचा स्वीकार संपूर्ण जगाने केला व आज दि.२१ जून २०२३ रोजी ९ वा आंतरराष्ट्रीय योगदान अतिशय उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमास उत्कृष्ट मार्गदर्शक लाभले. मार्गदर्शकांसोबत सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षकांनीही योगाभ्यास केला. उद्देश एकच अर्थात शरीराबरोबर मनाच्या हालचालींवर नियंत्रण!
योगाभ्यासामध्ये प्राथमिक शारीरिक हालचाली, सूर्यनमस्कार, विविध आसने,ॐकार उच्चारण,शांतीपाठ यांचा समावेश होता.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.७वी च्या कु. मुग्धा एकशिंगे आणि चि. सोहम जोशी या विद्यार्थ्यांनी केले. मान्यवर सौ. स्मिता कदम आणि त्यांचे सहकारी यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांनी योगाचे महत्त्व व त्याची जोपासना तसेच प्रचार प्रसारामध्ये आपली भूमिका याविषयी मार्गदर्शन करताना हास्ययोगही साधला व शुभेच्छा दिल्या.
अशाप्रकारे सुदृढ शरीर व प्रसन्न मनाने कार्यरत राहण्याचा संकल्प करत सर्वांनी योग दिनाचा आनंद घेतला.