Type Here to Get Search Results !

चौधरवाडी हनुमान मंदिर येथून श्री सोमेश्वर प्रसादिक दिंडी पायी वारी सासवड ते पंढरपूर संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यास प्रस्थान

चौधरवाडी हनुमान मंदिर येथून श्री सोमेश्वर प्रसादिक दिंडी पायी वारी सासवड ते पंढरपूर संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यास प्रस्थान
सोमेश्वरनगर - 'ज्ञानोबा माऊली-तुकाराम’चा जयघोष करत बारामती तालुक्यातील चौधरवाडी ग्रामस्थांसह उपस्थित वारकरी भाविकांच्या समवेत संत सोपानदेवांच्या पालखी सोहळ्यास सामील होण्यासाठी  गुरुवारी दि १५ जुन रोजी सकाळी दिंडी  सोहळा जाण्यासाठी प्रस्थान केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त , श्री सोमेश्वर सेवा भावी संस्था वतीने अध्यक्ष सुखदेव शिंदे व भारतीय पत्रकार संघ बारामती तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे यांच्या शुभहस्ते वारकरी बांधवांना ज्ञानेश्वरी ग्रंथ व खाऊ वाटप करण्यात आले ... डोक्यावर हंडा, तुळस घेत, मुखी सोपानदेवांचे नामस्मरण चौधरवाडी येथील हनुमान मंदिर येथून वारकरी  बांधवांचा भक्तिमय वातावरणात सोहळा निघाला, या प्रसंगी तरुण वर्गांचा मोठा प्रतिसाद लाभला तसेच श्री सोमेश्वर प्रसादिक दिंडी पायी वारी सासवड ते पंढरपूर संत सोपान काका पालखी सोहळ्यात दिंडीचे रथा पुढे ११वा नंबर  मालक- ह भ प विकास महाराज पवार  ,चालक- पोपटराव बाजीराव चौधरी,व्यवस्थापक- पोपटराव पवार दत्तात्रय चौधरी दिलीप पवार उपस्थित होते
याप्रसंगी मान्यवरांची श्री सोमेश्वर सेवाभावी अध्यक्ष सुखदेव शिंदे ,भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका अध्यक्ष विनोद गोलांडे , सोमनाथ देशमुख ,संदीप चौधरी, ऋषिकेश पवार ,रामदास चौधरी पोपटराव शिंदे, हनुमान देशमुख ,दत्तात्रय पवार ,चंद्रकांत पवार ,मारुती चौधरी ,धनसिंग शिंदे नवनाथ भापकर ,शशिकांत पवार ,विठ्ठल पवार  विनायक चौधरी ,रामदास देशमुख आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test