बारामती ! पौष्टीक तृणधान्य प्रसार दिनाचे काटेवाडी येथे आयोजन
बारामती : कृषि विभागाच्या वतीने मौजे काटेवाडी येथे कृषि संजिवनी सप्ताह २०२३ अंतर्गत पौष्टीक तृणधान्य प्रसार दिनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, उप विभागीय कार्यालयातील तंत्र अधिकारी रश्मी जोशी, मंडल कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषि पर्यवेक्षक मीरा राणे, कृषि सहायक सचिन खोमणे, सुप्रिया पवार, गावातील शेतकरी आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती बांदल यांनी पौष्टीक तृणधान्याचे आहाराच्या दृष्टीने तसेच कडधान्य, भाजीपाला, फळपिके, दुग्धजन्य पदार्थ यांचे आहारातील आरोग्याच्या दृष्टीने व विपणनाच्या दृष्टीने महत्व पटवून दिले.
कार्यक्रमामध्ये काटेवाडी गावातील महिलांनी विविध प्रकारच्या पौष्टीक तृणधान्याचे तयार केलेले खाद्यपदार्थ ठेवले होते. श्रीमती जोशी यांच्या हस्ते पहिल्या तीन महिलांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या महिलांना आकर्षक भेट वस्तू देवून गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी महिलांना परसबाग बियाणे वाटप करण्यात आले.