बारामतीत शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा
बारामती( दिगंबर पडकर) :-
शिवराज्याभिषेक (हिंदू साम्राज्यदिन) व छत्रपतींचे निष्ठावंत सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते श्री क्षेत्र कन्हेरी बारामती येथे कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला .यावेळेस माहिती फलकाचे उद्घाटन करण्यात आले. बारामतीतील परिसरातील नागरिकांना व सगळ्यांसाठीच सुभेदार देवकाते यांचा परिचय होण्यास मदत होणार आहे.
सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते स्मारक समितीच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून या कार्यक्रमाची सुरुवात केली. बारामतीमध्ये सरदाराची माहिती आपल्याला मिळावी आणि पुढे जाऊन देवकाते सरदारांचे उचित स्मारक उभा राहो यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती समितीचे प्रमुख ॲड. गोविंद देवकाते यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमासाठी मा. आमदार विजयराव मोरे, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष संपतराव देवकाते, छत्रपती सहकारी कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे ,डीपीडीसीचे सदस्य पांडुरंग कचरे ,भाजपाचे अध्यक्ष सतीश फाळके, बापूराव सोलंनकर ,देवेंद्र बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. व्याख्याते मधुकर हाके यांचे सविस्तर मार्गदर्शन झाले व मराठी संशोधन मंडळाचे अध्यक्ष सुरेश महानवर यांनीही उत्तम मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी समितीचे ॲड. गोविंद देवकाते , वसंतराव देवकाते ,अंकुश देवकाते, प्रकाश देवकाते, रमेश देवकाते, नितीन देवकाते आदींनी ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली . सूत्रसंचालन अनिल रुपनवर यांनी केले. प्रास्ताविक ऍडव्होकेट गोविंद देवकाते व आभार वसंतराव देवकते यांनी मांडले.