आजी, माजी सैनिकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने ... रोजी तालुकास्तरीय बैठक
पुणे : आजी, माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठित वेल्हा तालुकास्तरीय समितीची बैठक वेल्हे तहसील कार्यालय येथे ७ जून रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
आजी, माजी सैनिकांनी तालुकापातळीवरील अडीअडचणी असल्यास वेल्हे तहसिलदार कार्यालयामध्ये बैठकीच्या दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (नि.) एस. डी. हंगे यांनी केले आहे.