विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पहिले आणि आठवी पाठ्यपुस्तके उपलब्ध
पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक बालभारतीची चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.
ही पुस्तके यावर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावा या संदर्भातील उद्बोधन सत्र मंडळाने https://www.youtube.com/c/eBalbharati-msbt या लिंकवर १४ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून दिले आहे. इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पाठ्यपुस्तक मंडळाकडून करण्यात आले आहे.