बारामती ! रिक्षा, टॅक्सी व बस बॅच प्रश्नावर योग्य तो मार्ग काढण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांचे आश्वासन
बारामती(दिगंबर पडकर) - रिक्षा बॅच टॅक्सी बॅच बस बॅच या संदर्भात उद्भवलेल्या तांत्रिक मुद्द्यांबाबत उमेदवारांचे काम तात्काळ व्हावे यासाठी डॉ अजित शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांचे समवेत झालेल्या मीटिंगमध्ये संजीव भोर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे अमर देसाई सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस औद्योगिक विभाग अध्यक्ष संतोष कपटकर सत्यसेवा मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन अध्यक्ष एकनाथ ढोले मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य राजू घाटोळे व पुणे शहरातील ड्रायव्हिंग स्कूल संचालक उपस्थित होते या संदर्भात सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून बॅच काढण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना त्यांचे काम सुकरपणे होईल उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग निघेल सदर प्रश्न पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर यांच्याशी संपर्क साधून योग्य ते मार्ग काढू असे आश्वासन डॉ अजित शिंदे यांनी प्रसंगी दिले सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करण्यासाठी आवश्यक असलेल्या रिक्षा टॅक्सी व बस बॅच पुणे कार्यालयात उद्भवलेल्या प्रश्न बाबत सर्वसामान्य उमेदवारांच्या पाठीशी मी उभा आहे या प्रश्नावर त्वरित योग्य तो मार्ग काढावा म्हणून मी अजित शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांची लवकर प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रश्नावर मार्ग काढणार आहे ,असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले न्याय मागणीसाठी या उमेदवारांच्या पाठीशी मी सदैव राहील व कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे सुद्धा जोशी बोलताना म्हणाले सदर सर्वसामान्यांच्या प्रश्नावर व मराठी माणसांना न्याय मिळावा व सदर याबाबत मनसेचे नेते माननीय बाळा शेडगे यांनी दूरध्वनीवरून संजीव भोर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांच्याशी चर्चा केली व सदर बॅचच्या या प्रश्नावर मराठी माणसाच्या हितासाठी चर्चा केली ,राष्ट्रवादी काँग्रेस औद्योगिक विभाग अध्यक्ष संतोष कपटकर यांनी प्रत्यक्ष डॉक्टर अजित शिंदे यांच्या बरोबर झालेल्या मीटिंगमध्ये ते सहभागी झाले होते मराठी उद्योजकांना स्वयंरोजगारासाठी स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी व सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी रिक्षा टॅक्सी बस बॅच अत्यंत आवश्यक आहे व या न्याय मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस औद्योगिक विभाग नेहमीच मराठी उद्योजकांच्या पाठीशी कायम उभे राहील बेरोजगारीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न म्हणून मी या उमेदवारांच्या पाठीशी उभा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस औद्योगिक विभागाचे अध्यक्ष संतोष कपटकर सदर प्रसंगी म्हणाले
सदर बैठकीला सचिन गुंड भरत गायकवाड सुरज देवकर संदीप ढेरंगे आशिष पवार निलेश कैलास गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.