लोणी भापकर येथे "स्वच्छता अभियान फाउंडेशन" च्या वतीने गुणवंतांचा गौरव समारंभ संपन्न.
बारामती/लोणीभापकर :- बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील "स्वच्छता अभियान फाउंडेशन" च्या वतीने रविवार दि. २५ जुन रोजी श्री काळभैरव नाथ मंदीर येथे लोणी भापकर पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरती व इयत्ता दहावी,बारावी मधील गुणवंत विद्यार्थी यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते. प्रथम गुणवंत विद्यार्थी यांची गावातुन घोड्यावरून मिरवणूक काढुन विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर यांचे हस्ते सत्कार केले. तसेच गुणवंत विद्यार्थी यांचे पालक व शिक्षक वर्ग यांचा पण गुणगौरव केला. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामस्थ यांना गुलाब पुष्प देवुन त्यांचे स्वागत केले. तसेच स्वच्छता अभियान ग्रुप यांना मदत करणारे दानशूर व्यक्ती संजय पारडे, चारूदत्त बारवकर, माऊली भापकर, संजय गोलांडे, हर्षल प्रभुणे यांचा सत्कार केला.सदर कार्यक्रमामध्ये लोणीभापकर विविध कार्यकारी सोसायटी चे अध्यक्ष श्री बाबासाहेब भापकर यांनी सोसायटीच्या वतीने तसेच विलास भापकर, सुभेदार माणिक भापकर व लोणी भापकर ग्रामस्थ यांचे वतीने पण गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार केला.तसेच सेवानिवृत्त अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी गुणवंत विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रस्तावना प्रकाश भापकर, सुत्र संचालन अविनाश गायकवाड, ग्रुपचे कामाचा आढावा अभिजीत भापकर, स्वच्छता अभियान फाऊंडेशन ची पुढील ध्येय व उद्दिष्ट सचिन पवार, आभार प्रदर्शन हरीश्चंद दिक्षित यांनी केले.