संसदरत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरमध्ये महारुद्राभिषेक तर भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिर संपन्न
सोमेश्वरनगर - बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार संसदरत्न मा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरमध्ये शुक्रवार दि.३०जुन २०२३ रोजी सकाळी महारुद्राभिषेक करून केक कापण्याचा कार्यक्रम करण्यात आला व त्यानंतर भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
या शिबिरामध्ये १५० लोकांनी सहभाग नोंदवला ३५ जणांना मापक दराचे चष्मे वाटप करण्यात आले तर १५ मोतीबिंदूचे निदान झाले.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापती निताताई फरांदे ,श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमन प्रणिताताई खोमणे, बारामती पंचायत समितीच्या सदस्या मेनकाताई मगर, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव गोफणे, संचालक किसनराव तांबे ,अध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस देऊळवाडी अनिताताई भांडवलकर निरा मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब शिंदे ,करंजेपुल ग्रामपंचायतचे सरपंच वैभव गायकवाड ,मगरवाडी ग्रामपंचायतचे मा. सरपंच व प्रसिद्ध उद्योजक संतोष कोंढाळकर, चौधरवाडी उपसरपंच तानाजीराव भापकर बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष नितीनजी शेंडकर ,करंजे ग्रामपंचायतचे सदस्य दत्तात्रय फरांदे ,सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट सचिव संतोष भांडवलकर ,सोमनाथ देशमुख ,अनिल हुंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष सहकार्य बुधरानी हॉस्पिटलचे पुणे येथील सहकारी वैभवजी गाढवे यांचे लाभले
सर्व मान्यवरांचे आभार श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे यांनी मानले