Type Here to Get Search Results !

आजची महत्वाची बातमी...पोलिस पाटील पद भरतीचे गावनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवार ३० जुन... बारामती तालुक्यातील निंबुत, वाणेवाडी सह १३ गावांचा समावेश तर इंदापूर मधील २१ गावेलोकप्रतिनिधी, इच्छुक अर्जदार यांनी उपस्थित रहावे - वैभव नावडकर

आजची महत्वाची बातमी...पोलिस पाटील पद भरतीचे गावनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवार ३० जुन... 

बारामती तालुक्यातील निंबुत, वाणेवाडी सह १३ गावांचा समावेश तर इंदापूर मधील २१ गावे

लोकप्रतिनिधी, इच्छुक अर्जदार यांनी  उपस्थित रहावे - वैभव नावडकर

बारामती - बारामती उपविभागातील  बारामती व इंदापूर तालुक्यातील रिक्त असलेल्या ३४ गावातील पोलीस पाटील पद भरतीचे गावनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नवीन प्रशासकीय भवनातील सभागृहात ३० जून रोजी  आयोजित करण्यात आल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.


बारामती तालुक्यातील १३ गावातील पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. त्यामध्ये बारामती तालुक्यातील निंबुत, सोनगाव, शिर्सुफळ, सि.निबोडी, आंबी खु, जळगाव सुपे,  माळेगाव खुर्द, धुमाळवाडी, वाणेवाडी,  माळवाडी लाटे, देऊळवाडी, गाडीखेल व बजरंगवाडी या गावांचा समावेश आहे. 

इंदापूर तालुक्यातील पोलिस पाटील पदे रिक्त असलेली २१ गावे पुढीलप्रमाणे. कळंब, निरगुडे, सरडेवाडी, शहा, वरकुटे खु., कालठण नं. २, कुरवली,  व्याहळी,  कुंभारगाव, अवसरी, कोठाळी, निरनिमगाव, पवारवाडी, चव्हाणवाडी, काझड, डाळज नं. १, जाधववाडी,  जळकेवाडी, भावडी, राजवडी व गोंदी, या गावांचा समावेश आहे.


या सोडतीसाठी संबंधित गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी, इच्छुक अर्जदार यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोडतीस गैरहजर राहिल्यास नंतर कोणाची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test