सावधान ! सध्या पावसाला सुरुवात झाली आहे... विद्युत वाहिनी पोल नजीक वाहने, जनावरे व नागरिकांनी उभे राहू नये
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वर महावितरण मार्फत सर्व ग्राहकांना नम्र आवाहन करण्यात येते की सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे लाईन खाली जनावरे बांधू नये वीज खांब नजीक वाहने, जनावरे व नागरिकांनी उभे राहू नये पाऊसाच्या दिवसात तारा तुटण्याची शक्यता जास्त असते कृपया लाईन खाली जनावरे बांधू नये तसेच कुठे तार तुटल्या आढळल्यास मला किंवा तसे संबंधित वायरमनला फोन करून लगेच कळवावे जेणेकरून भविष्यातल्या दुर्घटना टाळता येतील असे नम्र आवाहन बारामती तील सोमेश्वर येथील कनिष्ठ अभियंता किशोर कहार महावितरण सह कर्मचारी वर्गाने केले आहे.