Type Here to Get Search Results !

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात प्रशासनाच्यावतीने स्वागत



जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात प्रशासनाच्यावतीने स्वागत
                                 
बारामती :   'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' अशा भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माउली तुकाराम' च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती तालुक्यात आगमन झाले. 

मौजे खराडेवाडी येथे प्रशासनाच्यावतीने  प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले.  यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, दौंडचे तहसिलदार अरुण शेलार, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, दौंडचे गट विकास अधिकारी अजिंक्य येळे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            
प्रशासनातर्फे वारकऱ्यांसाठी सुविधा 

बारामती तालुक्यात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम उंडवडी गवळयाची व बारामती शहरात शारदा प्रांगण या ठिकाणी असतो.  आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बारामती तालुक्यातील प्रशासन, बारामती नगरपरिषद, पंचायत समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्यावतीने तयारी केली आहे. पाणी, विज वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, फिरते सुलभ शौचालय, कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहेत. 

                                

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test