राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनदिनानिमित्त
"श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था" वतीने सोमेश्वर प्रसादिक दिंङीतील बांधवांना ज्ञानेश्वरी ग्रंथ व खाऊ वाटप
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर मधील दर वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मध्ये सोमेश्वर मंदिर येथील दिंडी सामील होत असते रविवार दिनांक ११ रोजी सकाळी श्री सोमेश्वर मंदिर ठिकाणावरून सोमेश्वर येथील दिंङीतील वारकरी प्रस्थान निमित्त व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ,व खाऊ वाटप करण्यात आले .
याप्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस बारामती अध्यक्ष संभाजी होळकर व पुणे जिल्हा विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्या शुभहस्ते दिंडीतील नागरिकांना ज्ञानेश्वरी ग्रंथ व खाऊ वाटप केले तर दिंङीला सुखरूप प्रवास घङावा.व आषाढीवारीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, एस टी महामंडळ नियंत्रक प्रमुख रमाकांत गायकवाड,श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवर शिंदे, निरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब शिंदे ,समर्थ ज्ञानपीठ अध्यक्ष अजिंक्य सावंत ,ग्रा.वाघळवाङी सरपंच हेमंत गायकवाड ,महेश शेंङकर, करंजे तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड ,सोमनाथ देशमुख ,सुनील जोशी,महेंद्र गायकवाड ,शिवाजी शेंङकर ,दिंङी चालक विनायक परांजपे ,बाळासाहेब भांङवलकर, भाऊसाहेब भांङवलकर,पत्रकार विनोद गोलांडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील जोशी यांनी केले तसेच दिंडी प्रस्थान ला शुभेच्छा देत उपस्थित मान्यवरांचे आभार अध्यक्ष सुखदेव शिंदे यांनी मानले.