लोणी भापकर प्रिमीयर लीगचा मोरया इंडियन्स मानकरी
लोणी भापकर(अविनाश बनसोडे) :-बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील भैरवनाथ एकता ग्रुप ने लोणी भापकर प्रिमीयर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या पहिल्या पर्वाचा विजेता अमोल मदने यांच्या नेतृत्वाखालील मोरया इंडियन्स हा संघ ठरला .त्यांनी मनोज मदने व निलेश गोलांडे यांच्या लोणी भापकर सुपर किंग या संघाला अंतिम सामन्यात १० गडी राखून विजय मिळवला.
पराजित संघाला द्वितीय पारितोषिक मिळाले. तर तिसऱ्या स्थानी अविनाश बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील सिध्दपुरी रॉयल्स राहिला. चौथ्या स्थानी भैरवनाथ टायटन्स हा संघ राहिला.या स्पर्धेला दुर्योधन भापकर ,महेंद्र बारवकर, अविनाश बारवकर,निलेश गोलांडे, निलेश भापकर यांचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच विजय बारवकर व मुख्याध्यापक संजय भापकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर पारितोषिक वितरण माजी उपसरपंच सुदाम मदने, उपसरपंच नंदकुमार मदने अजय बारवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजयकुमार गोलांडे, निलेश भापकर, सचिन भापकर, बाबुराव गोलांडे, मयूर खोमणे, बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यापुढे ही अधिक चांगल्याप्रकारे क्रिकेट स्पर्धेचे आयोजित करण्यात येणार आहे असे भैरवनाथ एकता ग्रुप च्या वतीने सांगण्यात आले.