बारामती ! माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उमेदवारांनी प्रवेश घेण्याचे आवाहन
प्रवेश निश्चित करण्यासाठ लिंक व सविस्तर माहिती
बारामती : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळेगाव बु. ता. बारामती येथे प्रवेश प्रक्रियेचे कामकाज सुरू झाले असून उमेदवारांनी ११ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी प्राचार्य यांनी केले आहे.
या संस्थेत एक वर्ष मुदतीचे सहा व दोन वर्ष मुदतीचे दहा अशा एकूण सोळा व्यवसायामध्ये ४४० उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संस्थेतील माहिती कक्षाशी संपर्क साधून जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही कळविण्यात आले आहे.