Type Here to Get Search Results !

बारामतीतील शारदानगरमध्ये उद्योग व्यवसाय मेळावा संपन्न पुस्तकी ज्ञान आणि प्रक्रिया ज्ञान च्या संगमावर यशस्वी व पवित्र उद्योग सुरू होतो: पी टी काळे

बारामतीतील शारदानगरमध्ये उद्योग व्यवसाय मेळावा संपन्न 

पुस्तकी ज्ञान आणि प्रक्रिया ज्ञान च्या संगमावर यशस्वी व पवित्र उद्योग सुरू होतो: पी टी काळे 

बारामती -  शारदानगर बारामती मध्ये रविवार दि 7 मे 2023 रोजी उद्योग मेळावा संपन्न झाला सदरचा मेळावा दे आसरा  फाउंडेशन पुणे, शारदा महिला संघ बारामती आणि एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्यावतीने अटल सभागृह, शेती महाविद्यालयाच्या जवळ शारदानगर बारामती येथे आयोजित केला होता. दे असरातर्फे राज्यात पुण्यात नागपूर कोल्हापूर यवतमाळ आणि चिपळूण येथे चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आज बारामती मध्ये मेळावा घेण्यात आला त्यामध्ये मार्गदर्शक म्हणून देअसरा संस्थेचे राहुल लिमये सेल्स व बिजनेस डेव्हलपमेंट एक्सपर्ट व किरण पवार डिजिटल मार्केटिंग तज्ञ आणि कृषी विभागाचे डी आर पी उद्योग व्यवसाय मार्गदर्शक पी टी काळे यांनी मार्गदर्शन केले महिला बचत गटाला व लघु उद्योगाला आर्थिक व मार्केटिंग मदत झाल्यास खऱ्या अर्थाने महिला आर्थिक सक्षम होऊन शकतील त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होईल असे मिळावेतील वक्ते पी टी काळे यांनी सांगितले तर किरण पवार यांनी संपूर्ण डिजिटल मार्केटिंगची माहिती सांगितली व राहुल लिमये यांनी बिझनेस वाढीसाठी उपाय यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमा मध्ये प्रमुख उपस्थिती  बारामती तालुक्याचे उद्योग आणि व्यापारचे अध्यक्ष सुभाष भाऊ चांदगुडे तसेच बारामती तालुका उद्योग व्यापारचे उपाध्यक्ष प्रकाश शेठ चांदगुडे उपाध्यक्ष पराग शहा व सदस्य राजेंद्र  धुमाळ व शिवाजीराव काळखैरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर धीरज शिंदे सर यांनी केले तर उपस्थित सभागृहातील व्यवसायिकांचे व वक्त्यांचे आभार संतोष गोडसे साहेब यांनी  मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test