मोटर वाहन निरीक्षक विजय सावंत यांचा जीवनप्रवास ; उत्कृष्ट कामगिरीबद्दल "कोविड योद्धा पुरस्कार"ने सन्मानित....मानाचा "सांगली भूषण पुरस्कार" ..!
दिगंबर पडकर,बारामती
मोटर वाहन निरीक्षक विजय शामराव सावंत ,पुणे यांचा जीवनप्रवास १९९२ ते ३१मे २०२३
परिवहन विभागामध्ये रुजू होण्याच्या अगोदर विजय सावंत यांनी रयत शिक्षण संस्था या अग्रगण्यसंस्थेत १९९२ ते मे १९९९ या कालावधीत प्रोफेसर पदावर यशस्वीपणे काम केले आहे.
दिनांक १७ मे १९९९ महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे सुरुवातीचे प्रशिक्षण परिवहन विभागाच्या वतीने घेतले त्यानंतर राज्य परिवहन महामंडळ भोसरी येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये ड्रायव्हिंग ट्रेनिंग चे प्रशिक्षण घेतले. परिवहन विभागातील प्रोफेशन पिरेड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सांगली येथे पूर्ण केला.
नोव्हेंबर १९९९ते २०२३ परिवहन कार्यालय मुंबई येथे आपली सेवा पार पाडली मे २०२३ परिवहन कार्यालय नाशिक कुंभमेळ्यात दरम्यान यशस्वी सेवा त्यांनी पार पाडली नोव्हेंबर २००४ रोजी उप परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड मध्ये विजय सावंत रुजू झाले नोव्हेंबर २००४ ते २००८ या कालावधीमध्ये आपली यशस्वी सेवा पार पाडली.
मे २००८ ते २०११ प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे मोटार वाहन निरीक्षक पदावर यशस्वी सेवा दिली. २०११ ते २०१५ उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण कार्यालयात त्यांनी काम पाहिले.
प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे २०१५ ते २०१८ आपले सेवा दिली.फेब्रुवारी २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर या कार्यालयात त्यांनी कामकाज पाहिले ७ सप्टेंबर २०२० ते ३२ मे २०२३ या काळात मोटार वाहन निरीक्षक पदावर प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे आपल्या कारकीर्दीतील शेवटची सेवा विजय सावंत यांनी पार पाडली.
विजय सावंत यांना २०१९ ते २०२० या महामारीच्या कोरोनाच्या कालखंडात उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना " कोविड योद्धा पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विजय सावंत यांना मानाचा "सांगली भूषण पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. महात्मा फुले पुरस्कार समाज भूषण म्हणून त्यांनी समाजात केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.