पोलिस महानिरीक्षकांचे आदेश; ऊस वाहतूकदारांना मिळणार दिलासा
फसवणाऱ्या मुकादमांना आता चाप
ऊस मुकादमांकडून सातत्याने होत असलेल्या फसवणुकीमुळे अनेक ऊस वाहतूकदार कर्जबाजारी झालेत. याबाबत वारंवार तक्रार होत असल्याने पोलिस महानिरीक्षकांनी दखल घेतली आहे. फसवणूक करणाऱ्या मुकादमावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.या आदेशामुळे फसवणुकीवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांना
ऊसतोडणी मजूर पुरवठा करीत असताना मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याची, तसेच दर वर्षी हजारो वाहनधारकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा या मुकादमांकडून घालण्यात येत असल्याबाबत वारंवार अनेक तक्रारी दाखल होत आहेत. मुकादम वाहनधारकास ऊसतोडणी करण्यासाठी मजूर उपलब्ध करून देण्यासाठी १० ते ४० लाखांपर्यंत अॅडव्हान्स घेतला जातो. हे मुकादम एका टोळीसाठी पाच ते सहा वाहनधारकांकडून अॅडव्हान्स घेऊन फक्त एकाच वाहनधारकास
मजूर उपलब्ध करून देतात. यामुळे उर्वरित वाहनधारकांची अॅडव्हान्स घेऊन फसवणूक होते. या फसवणुकीमुळे अनेक ट्रॅक्टर शेतकरी मालक बॅक लोन कर्ज सोसायटी खाजगी व्याजाने घेतलेले पैसे घराती सोने नाणे घाण ठेवून सर्व बाजूने कर्जबाजारी होतात. घेतलेला अॅडव्हान्स कारखान्यांना माघारी करता येत नसल्यामुळे ट्रॅक्टर विकावे लागले आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांना शेतजमीनही विकावी लागते. राज्यातील हजारो वाहनधारक या फसवणुकीचे बळी पडले असून, अनेक वाहनधारकांनी आत्महत्येचा मार्ग निवडला आहे.
आगामी हंगामाचे करार सुरू...
महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांचे आगामी हंगामासाठी ऊस तोड करण्यासाठी ट्रॅक्टर मालकाशी करार सुरू केले आहे. यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी ऊस तोड मुकादामांबरोबर करार सुरू केले आहेत. या मुकादमांना सध्या अॅडव्हान्स देण्याचे कामेही सुरू आहेत. याच काळात हा आदेश मिळाल्याने फसवणूक करणाऱ्या मुकादमांना चाप लागण्यास मदत होणार असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक कमी होण्यास मदत होणार आहे.