Type Here to Get Search Results !

भविष्यात शेंडकरवाडी ही पोलिसांची वाडी म्हणून ओळखली जावी -माजी संचालक रुपचंद शेंडकरशेंडकरवाडी येथे पोलीस भरती झालेल्या युवकांचा सत्कार.

भविष्यात शेंडकरवाडी ही पोलिसांची वाडी म्हणून ओळखली जावी -माजी संचालक रुपचंद शेंडकर
शेंडकरवाडी येथे पोलीस भरती झालेल्या  युवकांचा सत्कार.

सोमेश्वरनगर -  बारामती तालुक्यातील करंजेपूल शेंडकरवाडी  बुधवार दि २४ रोजी  नुकत्याच झालेल्या पोलीस भरती मध्ये प्रणय खेंगरे (पुणे शहर), तेजस खेंगरे( मुंबई शहर) ,लखन माने(पुणे ग्रामीण),चेतन कोळपे(नवी मुंबई) या चार युवकांचा सत्कार   प्रमुख पाहुणे श्री सोमेश्वर कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड, माजी संचालक रुपचंद शेंडकर, आजी माजी सैनिक संघ अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस हवालदार अमोल भोसले, स्वामी विवेकानंद अभ्यासिका संस्थापक गणेश सावंत,निरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते पुष्पहार, शाल श्रीफळ देत करण्यात आला, यावेळी शेंडकरवाडी ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी मनोगतात पोलीस भरती विषयी शेंडकर वाडीतून असंख्य मुले भरती व्हावी आणि सोमेश्वरनगर सह शेंडकरवाडी गावं एक अधिकाऱ्याचे गावं म्हणून ओळखावं ,भरती झालेल्या युवकांना प्रोत्साहन मिळावे व ते भविष्यात पोलीस क्षेत्रात अधिक उंची गाटावी असे कार्यक्रम प्रसंगी मनोगतात ,निखिल शेंडकर,राहुल शेंडकर,गणेश सावंत यांनी म्हटले.तर  माजी  संचालक रुपचंद शेंडकर बोलताना म्हणाले की शेंडकर वाडी मध्ये सध्या डिफेन्स मध्ये २५ आजी माजी सैनिक असून सिविल इंजिनियर ,मेकॅनिकल अशा विविध पदांवर मुले कार्यरतही आहेत तसेच आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वर परिसरात स्थापनेपासून यांचे विविध क्षेत्रातील कामाबद्दल  कौतुक केले  ,सोमेश्वरनगर परिसरातील तब्बल ४० विद्यार्थी  नुकत्याच झालेल्या  पोलीस भरती झालेले असल्याने जिल्ह्यात चर्चा आहे... भरती झालेल्या सर्वांनाच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम आयोजन शेंडकरवाडी ग्रामस्थ यांनी केले   प्रास्ताविक अंकुश डोंबाळे तर आभार माजी संचालक रूपचंद शेंडकर व  शिवाजी शेंडकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test