भयानक .... तो मृतदेह असा की .... छाती आणि पाय दोन्हीला दगड एका रस्सीने बांधून तलावात मिळून आला.... शिर्सुफळ हद्दीतील घटना.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दि २५ रोजी दुपारी १२ वाजता पूर्वी शिर्सुफळ गावातील तलावात एक मयत पुरुष जातीची बॉडी पाण्याचे वर तरंगत असताना दिसत असल्याचे समजले नंतर त्याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे, प्रभारी अधिकारी श्री. मोरे व पोलीस स्टाफ पोहोचले, गावातील लोक व पोलिस यांचे मदतीने सदर मयत बॉडी पाण्यातून काढली असता सदरची बॉडी एका अनोळखी पुरुष (वय अंदाजे ३० वर्ष) दिसत असुन ती पिवळ्या रंगाचे रस्सीने ठिकठिकाणी बांधलेली दिसत असून त्याच्या छातीवर व दोन्ही पायाला दगड बांधलेला दिसत असुन सदर मयताचे अंगावर अंडरवेअर असुन इतर कोणतीही कपडे नाहीत अशा परिस्थितीत सदर मयत बॉडी अॅम्बुलन्स मधुन रुई हॉस्पीटल बारामती येथे पाठवुन दिली आहे.
मौजे शिर्सुफळ या गावचा तंटामुक्त अध्यक्ष सदाशिव लिंबाजी आटोळे यांचे जबाबावरुन आकस्मिक मयत रजि. क्र.४९/२०२३ फौज. प्र.स.कलम १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पथके तपास मयताची ओळख पटविण्याचे कार्यवाही करीत आहेत.