Type Here to Get Search Results !

शिरुर उपविभागीय कार्यालयाअंतर्गत सर्व मंडळ स्तरावर ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे आयोजन

शिरुर उपविभागीय कार्यालयाअंतर्गत सर्व मंडळ स्तरावर ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे आयोजन
पुणे : शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची गतिमानपद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी शिरुर उपविभागीय कार्यालयाअंतर्गत सर्व मंडळ स्तरावर ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे.


शासकीय योजनांशी निगडीत संबंधित कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येऊन नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. न्हावरा मंडळाअंतर्गत तलाठी कार्यालय न्हावरा येथे आणि मंडळ अधिकारी कार्यालय वडगाव रासाई येथे २३ मे रोजी, शिरुर व रांजणगाव गणपतीमंडळाअंतर्गत  जुनी नगरपालिका सभागृह शिरुर येथे २४ मे रोजी, तळेगाव ढमढेरे व कोरेगाव भिमा मंडळाअंतर्गत गौरी नंदन मंगल कार्यालय, कोरेगाव भिमा येथे २६ मे रोजी,  पाबळ व मलठण मंडळाअंतर्गत भैरवनाथ विद्या मंदीर पाबळ येथे २९ मे रोजी आणि टाकळी हाजी मंडळाअंतर्गत बापुसाहेब गावडे विद्यालयाच्या शेजारील पोलीस स्थानक जवळील टाकळी हाजीचे मागील सभागृह येथे येथे ३१ मे रोजी अभियानाचे आयेाजन करण्यात आले आहे.

अभियांनातंर्गत आयोजित शिबिरामध्ये महसूल, नगर विकास, पोलीस, कृषि, सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग पंचायत समिती समितीअंतर्गत येणारे विविध विभाग, जि.प. बांधकाम, सहकार, महिला व बालविकास, पशुवैद्यकीय, सामाजिक वनीकरण, वन, ग्रामीण पाणी पुरवठा, महावितरण, एस.टी. महामंडळ, पोस्ट ऑफीस व सर्व बँक आदी शासनाच्या सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्याची कार्यवाही करणार आहे. 

यावेळी नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. त्याच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येणार आहे.  योजनेसाठी पात्र प्रस्तावित लाभाथ्यांची यादी तयार करुन योजनेचे लाभ देण्यात येणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test