Type Here to Get Search Results !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सॉफ्टवेअरचे २२ मे रोजी लोकार्पण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सॉफ्टवेअरचे २२ मे रोजी लोकार्पण
पुणे, दि.१९:  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचे   लोकार्पण व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या यशोगाथेचे प्रकाशन  २२ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी पुणे येथे सकाळी ११.३० वाजता करण्यात येणार आहे. तसेच यावेळी समान संधी केंद्राच्या प्राचार्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती परंतू विद्यार्थ्यांना सुलभरित्या अर्ज करता यावे म्हणून योजनेचे ऑनलाईन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले. 


सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे या कार्यालयामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, विमान व इमाव इत्यादी प्रवर्गासाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही एक कल्याणकारी योजना राबविली जाते.  स्वाधार योजनेसाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये १० कोटी ९ लाख ३८ हजार  खर्च करण्यात आला. तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये माहे एप्रिल २०२३ अखेर ६ कोटी ५६ लाख ७२ हजार खर्च करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास स्वाधार योजनेसाठी रु. ८ कोटी ८० लाख ३ हजार इतकी तरतूद प्राप्त झालेली आहे.


स्वाधार योजनेबाबत विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास त्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे  कार्यालयाशी संपर्क साधावा असे सहायक आयुक्त समाज कल्याण संगिता डावखर यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test