अभिमानास्पद ! बारामतीतील माजी सैनिकाचा मुलगा राधेय महेश पाठक बनला "आर्मी एअर डिफेन्सचा लेफ्टनंट".
बारामती प्रतिनिधी :
बारामतीतील माजी सैनिक महेश दिनकर पाठक यांनी सन १९९० ते २००७ अशी १७ वर्ष भारतीय थलसेनेत हवालदार या पदावर सेवा करून निवृत्त झाले त्यांनी सुद्धा १७ वर्षात ३ वेळा जम्मू काश्मीर (उडी, राजोरी, लेह आणि सियाचीन ग्लेशियर ) येथे कर्तव्यास राहुन देश सेवा उत्तम पार पडली आहे त्यांच्या मुलागा राधेय याला सुध्दा आर्मी मध्ये चांगला ऑफिसर बनवायचा अशी त्यांची ईच्या होती वडिलांच्या ईच्या पूर्ण करायच्या म्हणून राधेय खुप मेहनत घेत त्याने इयत्ता १० वी पर्यंत बाल विकास मंदिर ICSE मध्ये शिकला त्यानंतर त्याने वालचंद कॉलेज,सांगली येथून डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल आणि कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे COEP येथून B Tech इलेक्ट्रिकल पूर्ण केले ..विशेष म्हणजे त्याने सर्व परीक्षा मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला आहे, सन २०२० मध्ये झालेल्या UPSC च्या CDSE लेखी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय १२५ रँक ने उत्तीर्ण झाला आणि त्यानंतर SSB बंगलोर येथील अत्यंत काढीन अशा इंटरव्ह्यू i मध्ये त्याला पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त झाले दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी त्याचे ऑफिसर ट्रेनिंग अकादमी चेन्नई येथील प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण झाल्यावर आर्मी एअर डिफेन्स मध्ये त्याची लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली.
तशी राधेयला शालेय जीवनापासून मैदानी खेळ थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक आणि सायकलिंग ची खूप आवड असल्याने त्याला राज्य स्तरीय भाला फेक स्पर्धा जिंकल्या होत्या, या शिवाय तो पेडल पोयट्रि हा एक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा चालवत असे कौटुंबिक सांगायचे झाले तर राधेय ची आई एक उद्योजिका असून तिचा लेडीज शॉपी चा व्यवसाय आहे, वडील माजी सैनिक असून सध्या आर्थिक नियोजन सल्लागार म्हणून कार्यरत आहेत,लहान बहीण १२ वी नंतर एल एल बी प्रवेशाची तयारी करत आहे. सुसंस्कृत व सुशिक्षित कुटुंबातून राधेय आर्मी एअर डिफेन्सचा लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाल्याने बारामती शहर परिसर व मित्र परिवाराकडून कुटुंबासह राधेयचे कौतुक होत आहे.