निधन वार्ता ! भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे यांना मातृशोक
जेजुरी (प्रतिनिधी) - जेजुरी येथील भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश लेंडे यांच्या मातोश्री श्रीमती युमनाबाई ऊर्फ भागीरथीबाई वसंतराव लेंडे यांचे वृध्दापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या जाण्याने जेजुरी आणि धालेवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे अतिशय कडक आणि करारी स्वभाव असलेल्या या मातेने त्यांच्या माहेरी (खामगाव ता फलटण) येथे चार वर्षे पाटीलकी केली होती आपल्या पाचही मुलांना त्यांनी चांगल्या प्रकारे संस्कार देऊन घडवले त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली,सुना, जावई, नातवंडे,परतवंडे असा परिवार असुन भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे तसेच समर्थ सेवा नागरी सहकारी पतसंस्थाचे चेअरमन बाळासाहेब लेंडे यांच्या त्या मातोश्री होत तर सेवा निवृत्त पोलिस अधिकारी देविदास लेंडे, उत्तम लेंडे, धालेवाडी चे माजी सरपंच अनिल लेंडे, माजी सदस्य सुनिल लेंडे यांच्या त्या चुलती होत