पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत करंजेपुल यांच्यावतीने उल्लेखनीय कार्याबद्दल महिलांचा सन्मान.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत करंजेपुलमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरण व आरोग्य व स्वयंसहाय्यता बचत गट निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. रेश्मा श्रीकांत शेंडकर व सौ. संयोगीता शरद धुर्वे यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा. ग्रामपंचायत सदस्य सौ. सविता जयराम लकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. सुनंदा बाबूलाल पाटोळे, श्रीमती रेखा नवनाथ गायकवाड, मीनाक्षी अरुण बडेकर, आशा सेविका वर्षा गणेश रिठे, व ज्योती संतोष भगत या महिलांचा सुद्धा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रामसेविका सुजाता संदीप आगवणे व अंगणवाडी पर्यवेक्षिका शमिका विठ्ठल दगडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली व उपस्थितांचे आभार मानले.