पुरंदर ! टी.एम.जी. एम. व्ही. एस. संस्थेच्या वतीने अॅड.उमाकांत आदमाने यांना “सलाम इंडिया अभिमान पुरस्कार” जाहीर
पुरंदर प्रतिनिधी(सिकंदर नदाफ) टी. एम. जी, एम व्ही एस, नवीन पनवेल संस्थेतर्फे अॅड.उमाकांत मधुकर आदमाने यांना राष्ट्रीय कार्यकर्तुत्व सन्मान महोत्सव या विशेष उपक्रमा अंतर्गत सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्ल “सलाम इंडिया अभिमान पुरस्कार” निवडपत्र देऊन जाहीर करण्यात आला आहे .
अॅड. उमाकांत मधुकर आदमाने हे सध्या शिवाजीनगर, जिल्हा सत्र न्यायालयात पुणे येथे वकिली व्यवसाया बरोबरच नोटरीचे देखील काम करतात त्यांची आणखी एक नवी ओळख म्हणजे सुंदर कवी, लेखक, साहित्यीक देखीलआहेत. त्यांनी आगामी काळात खुप सुंदर विषयावर कविता सादर करून कवी रसिकांची मने जिंकली, अॅड.उमाकांत आदमाने हे नुकतेच नोटरी झाले असले कारणाने वकिली व्यवसाया बरोबरच त्यांनी लॉकडाऊनच्या काळात कवितेचा यशस्वी प्रवास करत साहित्य क्षेत्रात देखील आपला ठसा प्रामाणिकपणे उमटविला आहे, अनेक राजस्तरीय काव्यसंमेलनात सहभाग घेऊन त्यांना साहित्य क्षेत्रातील उपक्रम आणि अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत, तसेच सामाजिक बांधिलकी जपत राज्य शासनाने त्यांची दखल घेत सामाजिक पुरस्कार सुद्धा बहाल केले आहेत.त्यांना राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट स्वयंसेवक राज्य पुरस्कार’ मुंबई २००८-०९, व महाराष्ट्र शासनाचा ‘विशेष सामाजिक कार्य पुरस्कार’ लातूर २०१२ मिळाला आहे.
त्यांचे ध्येय हेच की जनसेवा हीच राष्ट्रसेवा समजुन काम करणे असून शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी या विचारातून अनेक गरजवंत विध्यार्थाना शैक्षणिक साहित्य, गणवेश वाटप करून त्यांना आधार देण्याचे काम केले आहे, तसेच ते मुळचे लातूर या गावाचे असून याअगोदर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गाव मौजे पुणे, लातूर, सागंली, सातारा, बीड, उस्मानाबाद, नांदेड, राजस्थान, बेंगलोर, येथे जाऊन दहा दिवसीय शिबिरात सहभाग घेऊन “पाणी संरक्षण “ पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश सर्व महाराष्ट्रभर पसरविण्याचे अतिशय मोलाचे काम त्यांनी केले आहे.