बारामती ! महिलांसाठी कायदेविषयक
मार्गदर्शन
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा
अनिता गायकवाड यांच्या संकल्पनेतून शारदा
प्रांगण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात
महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे
आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी बारामती
शहरातील अनेक महिलांनी उपस्थिती लावून
मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी बारामती
वकील संघटनेच्या मा. उपाध्यक्षा अँड. स्नेहा
भापकर यांनी महिला विषयक अनेक कायद्यांचे
माहिती देऊन उपस्थित महिलांच्या शंकांचे निरसन
केले. योग्य वेळी कायद्याचा वापर केला तर
भविष्यात येणाऱ्या मोठ्या समस्या आपण टाळू
शकतो अशी प्रतिपादन देखील त्यांनी केले.