अॅड.दत्ताञय फडतरे यांचे आॅल इंडीया बार परीक्षेत यश
पुणे - पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या पश्चिम परिसरातील बोपगाव मधील अॅड .दत्ताञय फडतरे यांनी आखिल भारतीय बार परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे .नुकतेच बार कौन्सिल आॅफ इंडीया दवारे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले .या निकालादवारे अॅड . फडतरे भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयांत तसेच सर्वोच्च न्यायालयात वकीली करण्यासाठी पाञ ठरले आहेत . सर्वसामान्य शेतकरी कुंटुबांतील अॅड. फडतरे यांनी आॅल इंडिया परिक्षेत बाजी मारली आहे .यामुळे त्याचे सर्वञ कौतुक होत आहे .
कोणतीही मोठी पार्श्वभुमी नसताना ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षण ते न्यायव्यवस्थेतील एका मानाच्या उंचीवर ते वकीली करण्यासाठी पाञ ठरले आहेत.
त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत झाले .पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय , सासवड मधुन तर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण एस.पी काॅलेज टिळक रोड येथुन घेतले .पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयातुन कायद्याचे ( एलएल.बी )शिक्षण पुर्ण केले आहे . ते सध्या पुणे जिल्हा आणि सञ न्यायालयात प्रॅक्टीस करत आहेत.
जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचारांच्या संगतीत राहणे , आपल्याबददल आजुबाजुचे लोक काय विचार करतात या गोष्टी पुर्णपणे बाजुला ठेवुन सध्याच्या जगत असलेल्या परिस्थितीचे भांडवल व दिखावा न करता मोठे ध्येय घेवून जगले तर यशस्वी होणे अवघड नसल्याचे अॅड . फडतरे यांनी सांगितले .
शाळा - महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तक व शालेय अभ्यासक्रमांबरोबरच , त्यापलीकडे पाहण्याची दुरदृष्टी अधिक विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली .