सोमेश्वरनगर ठरतेय युवकांसाठी पोलीस भरतीचे केंद्र ; तब्बल एवढे विद्यार्थी झाले महाराष्ट्र पोलीसात रुजू
सोमेश्वरनगर प्रतिनिधी -पोलीस सेवेमध्ये नव्याने रुजू होणाऱ्या तरुणांना पोलीस झाल्यानंतर नोकरीं करताना स्वतःमध्ये बदल करावा लागेल असं अगळं पगळं राहून नाही चालणार.तुमच्या येणारी लोक ही खूप अपेक्षेने येणार आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेणं तुमचं काम असेल. माणूस अडचणी मध्ये असल्यानंतर दोनच ठिकाणी जातो एक म्हणजे म्हणजे मंदिरात आणि दुसरं पोलीस स्टेशनमध्ये त्यामुळे तुम्हाला समाजातील अडचणीमध्ये असणाऱ्या लोकांची मदत करण्याची संधी मिळते. कधी आपल्या आई-वडिलांची मान खाली जाईल असं कधी वागू नका. नोकरी करत असताना तुमच्या फिटनेस कडे विशेष लक्ष द्या. पोलिसा समाजातील खूप महत्त्वाचा घटक आहे खूप आशेने तुमच्याकडे पहिले जाते.पोलीस दलामध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो एक पोलीस दलातील घटक समजून भावी वाटचालीसाठी सर्वाना शुभेच्छा आनंद भोईटे
(Add. S.P. पुणे ग्रामीण) यांनी कार्यक्रम प्रसंगी बोलताना दिल्या पोलीस भरती २०२३ मध्ये निवड
झालेल्या गुणवंतांचा भव्य सत्कार समारंभ सोमेश्वर
नगर येथे मंगळवार दि २३ रोजी सायंकाळी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर,आनंद भोईटे
(Add. S.P. पुणे ग्रामीण),सोमेश्वरकारखाना माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे, संचालक लक्षमन गोफणे, सरपंच हेमंत गायकवाड, दिग्विजय जगताप,उद्योजक आर एन शिंदे, मु सा काकडे महाविद्यालयात प्राचार्य डॉ देविदास वायदंडे, पुणे जिल्हा वाहतुक नियंत्रक रमाकांत गायकवाड, विक्रम भोसले, सुनील भोसले,केशवराव जाधव, नितीन जाधव,राजेंद्र बडदे,योगेश सोळस्कर,गोलांडे सर जगताप सर,नितीन ननावरे आदी उपस्थित मान्यवर असून कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन चेतन भोसले तर प्रास्ताविक गणेश सावंत यांनी केले.