सोमेश्वरनगर ! शेंडकरवाडी येथे मुंबई शहर पोलीस भरती झालेल्या युवकांचा सत्कार.
सोमेश्वरनगर - नुकत्याच झालेल्या पोलीस भरती मध्ये बारामती शेंडकर वाडी येथे प्रणय खेंगरे (पुणे शहर), तेजस खेंगरे( मुंबई शहर) ,लखन माने(पुणे ग्रामीण),चेतन कोळपे(नवी मुंबई) या चार युवकांचा सत्कार पुष्पहार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत युवा नेते निखिल शेंङकर यांनी केले.
प्रमुख पाहुणे श्री सोमेश्वर कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड, माजी संचालक रुपचंद शेंडकर, आजी माजी सैनिक संघ अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस हवालदार अमोल भोसले, स्वामी विवेकानंद अभ्यासिका संस्थापक गणेश सावंत,निरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला, यावेळी शेंडकर वाडी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी मनोगतात पोलीस भरती विषयी शेंडकर वाडीतून असंख्य मुले भरती व्हावी आणि सोमेश्वरनगर सह शेंडकरवाडी गावं एक अधिकाऱ्याचे गावं म्हणून ओळखावं असे कार्यक्रम प्रसंगी मनोगतात राहुल शेंडकर,गणेश सावंत यांनी म्हटले.तर माजी संचालक रुपचंद शेंडकर बोलताना म्हणाले की डिफेन्स मध्ये २५ माजी सैनिक असून माजी सैनिक असून सिविल मध्ये इंजिनियर मेकॅनिकल अशा विविध पदांवर मुले कार्यरतही आहेत तसेच आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वर परिसरात स्थापनेपासून यांचे विविध क्षेत्रातील कामाबद्दल कौतुक केले ,सोमेश्वरनगर परिसरातील तब्बल ४० विद्यार्थी
नुकत्याच झालेल्या पोलीस भरती झालेले असल्याने जिल्ह्यात चर्चा आहे...
कार्यक्रम आयोजन शेंडकरवाडी ग्रामस्थ यांनी केले होते प्रास्ताविक अंकुश डोंबाळे तर आभार माजी संचालक रूपचंद शेंडकर व शिवाजी शेंडकर यांनी मानले.