जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेतमजुराची मुलगी झाली मुंबई पोलीस
बारामती : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण आकाशाला ही गवसणी घालू शकतो याचे उत्तम उदाहरण आज मुंबई पोलीस म्हणून भरती झालेल्या आरती बाळासो सकट हिच्या रूपाने पहायला मिळाले.
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची चार भावंड त्यातही तीन नंबरची मुलगी. आई आणि वडील रोज लोकांच्या शेतामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब राब राबण्याचा नित्य नियम. कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आई वडील शेतमजूर असल्यामुळे कधी हाताला काम तर कधी नाही एक वेळ खाण्याचीही पंचायत , तिनेही शिक्षण घेत आई-वडिलांच्या बरोबर शेतमजुरी अगदीच खुरपण्या पर्यंतची काम ते शेताला खत घालण्याची कामेही केली. परंतु ती जिद्द हरली नाही तिला तिच्या लग्नासाठी ही पाहुणेरावळे भावभावकी की यांनी आग्रह धरला पाहुणे पसंत आले नाही म्हणून कोणी रुसली ही परंतु जिद्दीला पेटलेल्या आरतीने मात्र हे सगळं सहन केलं आणि जिद्द व चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस होण्याची स्वप्न साकार करून दाखवलं. पोलीस झाले ही बातमी सुद्धा एखाद्या चित्रपटातील प्रसंगा सारखीच तिला आई-वडील शेतात मोलमजुरीसाठी गेले असता घरातील काम करत असताना तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला व अभिनंदन केले अभिनंदन कशाबद्दल विचारले असता तिने तू मुंबई पोलीस झाली असे सांगितले आणि आरतीच्या आनंदाला पारावर उरला नाही तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले आणि पहिला फोन आपल्या वडिलांना केला तुम्ही घरी या मी मुंबई पोलीस झाले नेहमीचा रस्ता मात्र वडिलांना सरता सरेना वडील आणि मुलीची जशी भेट झाली दोघेही धाई मोकलून आनंदाने रडू लागले आणि माझ्या लेकीने माझ्या कष्टाचं चीज केलं म्हणून सदैव पाठीशी खंबीर उभ्या राहिलेल्या आई-वडिलांना मात्र अश्रू अनावर झाले आणि एका शेतमजुराची मुलगी मुंबई पोलीस झाली.