...तो निर्णय माघारी घेण्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सासरवाडीतून एकच सूर.
सोमेश्वरनगर - माजी कृषिमंत्री भारत सरकार तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा अचानक सेवानिवृत्ती होण्याच्या निर्णय घेतलेला असल्याचे समजताच शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सासरवाडीतील अर्थातच बारामती तालुक्यातील चौधरवाडी या ठिकाणी असणारे वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यांसाठी एकनिष्ठ असणाऱ्या नागरिकांचा एकच सूर निघत आहे तो म्हणजे त्यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा सेवानिवृत्तीचा निर्णय माघारी घ्यावा यासंदर्भात त्यांची भेट घेत त्यांना विनंती ही करणार असल्याचे चौधरवाडीतील ग्रामस्थ यांनी आज मंगळवार दिनांक २ रोजी एकत्रित बोलताना सांगितले