महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत अमरजीत सतीश लकडे उत्तीर्ण.
सोमेश्वरनगर - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने(सण २०२२) घेण्यात आलेल्या सहाय्यक नगर रचनाकार अधिकारी श्रेणी एक महाराष्ट्र राज्यातून बाराव्या क्रमांकाने बारामती तालुक्यातील निंबुत गावचे सुपुत्र अमरजीत सतीश लकडे यांची निवड झाली आहे. अमरजीत यांचे शिक्षण बी ई सिविल झालेले असून. त्यांनी चार वेळा यूपीएससी सीडीएस पास होऊन इंटरव्यू दिलेला आहे एमपीएससी राज्यसेवा मेन्स मधून नुकतीच भूमी अभिलेख विभागात देखील त्यांची निवड झालेली आहे.अशा विविध स्पर्धा परीक्षांच्या अपयशांना न खचता त्यांनी जिद्द व चिकाटी अभ्यास व परिश्रमाच्या जोरावर आज ग्रेड वन ऑफिसर ची पोस्ट मिळवलेली आहे. त्यासाठी त्यांचे वडील मु.सा. काकडे महाविद्यालयाचे सचिव सतीश लकडे यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर निंबूत व परिसरातील युवकांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.