Type Here to Get Search Results !

वेताळ टेकडी वरती ... पोल्सचे बांधकाम तात्काळ थांबवावे विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पत्राद्वारे लेखी सूचना.

वेताळ टेकडी वरती ... पोल्सचे बांधकाम तात्काळ थांबवावे - उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पत्राद्वारे लेखी सूचना.
पुणे  :  बालभारती ते पौड फाटा लिंक रोडबाबत महानगरपालिकाकडे  प्राप्त हरकतींबाबत  सविस्तर सुनावणी होईपर्यंत सदर टेकडीवरती कोणतेही कामकाज करण्यात येऊ नये, तसेच वृक्षतोडही न करण्याबाबत सूचना संबंधितांना तात्काळ देण्यात याव्यात अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी  नगरविकास विभाग प्रधान सचिव आणि पुणे मनपा आयुक्तांना पत्राद्वारे दिल्या आहेत.

बालभारती ते पौड फाटा लिंक रोडबाबत रेखांकन करण्याचे काम सध्या सुरू असून त्यानुषंगाने वेताळ टेकडीवरती २५० काँक्रीट पोल्स उभे करून रस्त्याचे रेखांकन करण्यात येणार आहे.  याबाबत २५ एप्रिल रोजी पत्राद्वारे  न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे वृक्षतोड करू नये तसेच रहदारी कमी करण्यासाठी सदर रस्त्याचा उपयोग किती होणार आहे याचेही सर्वेक्षण करावे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले होते. तसेच पुणे शहरातील पर्यावरण संरक्षणामध्ये काम करणाऱ्या संस्थांना सहभागी करून त्यांचे हरकतीचा सकारात्मक विचार करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार हरकतींवर  सुनावणी होईपर्यंत कोणतेही काम न करण्याचा आणि याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनादेखील त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test