उद्या (शनिवार) रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण दिन.
तक्रारी प्रलंबित अगर कारवाई संदर्भात समाधान न झालेल्या नागरिकांनी हजर रहावे- सचिन काळे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांना कळवण्यात येते की, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे प्रलंबित असलेल्या तक्रारींबाबत तक्रार निवारण दिनाचे आयोजन उद्या दि.६ रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत करण्यात आले असुन, सदर तक्रार निवारण दिनाकरिता आनंद भोईटे अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, व गणेश इंगले उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग हे हजर राहणार आहेत.