करंजे गावच्या कन्या श्रुतिका पवार व पायल पवार यांची मुंबई शहर पोलीस पदी निवड.
करंजे गावच्या वैभवात आणखीन एक भर
सोमेश्वर नगर प्रतिनिधी- नुकत्याच झालेल्या मुंबई शहर पोलीस भरती मध्ये बारामती तालुक्यातील करंजे गावच्या कन्या श्रुतिका सतीश पवार आणि पायल सुरेश पवार यांची मुंबई शहर पोलीस पदी निवड झाली, तसे पवार कुटूंब म्हणचे जेमथेंब शेती आणि मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे कुटूंब , श्रुतिका आणि पायल या सख्ख्या चुलत बहिणी दोघींची मनापासून इच्छा एकच ती म्हणजे पोलीस भरती तसे पवार कुटुंबाचे हेच स्वप्न ... हे स्वप्न पूर्णच करायचे अशी दोघी बहिणी ची जिद्द त्यामुळे त्यांनी द परफेक्ट अकॅडमी माळेगाव येथे आपले पोलीस भरती प्रशिक्षण लक्ष्मण भोसले ,कीर्ती पवार आणि ग्राउंड शिक्षक म्हणून राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आणि स्वतःच्या जिद्दचिकाटीच्या जोरावर त्यांनी खाकी वर्दीला गवसणी घातली त्यामुळे करंजे सह सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिक त्यांचे कौतुक करत शाब्बासकीची थाप देत असून सर्वत्र त्यांचा सत्कार व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
पोलीस भरती होत आई वडिलांचे स्वप्न आम्ही दोघींनी पूर्ण केले आणि पवार कुटूंबाचे नाव आणखी मोठ्या शिखरावर नक्कीच नेहणार तर अभिमान असणाऱ्या करंजे गावचा आदरयुक्त ठसा कर्तव्य बजावत उमठावणार
---- श्रुतिका पवार /पायल पवार ----