पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी राहुल गोलांदे यांची निवड.
सोमेश्वरनगर :बारामती तालुक्यातील मु सा काकडे महाविद्यालयातील प्रा. राहुल बाळासाहेब गोलांदेे यांची पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड बहुमताने निवड करण्यात आली.नुकत्याच झालेल्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही निवड करण्यात आली.याचबरोबर संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.लक्ष्मण रोडे (महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय,मंचर)
यांची तर सचिवपदी प्रा.विक्रम काळे(गेंदिबाई चोपडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चिंचवड) यांची निवड करण्यात आली आहे. निवड २०२३ ते २०२६ या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
प्रा.राहुल गोलांदे हे मु.सा.काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर तालुका बारामती येथे २००७ पासून संरक्षण शास्त्र या विषयासाठी कार्यरत आहे. त्यांनी
आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडविले आहेत तसेच संघटनेने आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या आंदोलनात सहभागी होऊन काम करत आहेत. महाविद्यालयला हा बहुमान मिळवून दिल्याबद्दल महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे, सचिव प्रा. जयवंत घोरपडे, सहसचिव सतीश लकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांचेसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.